Tuesday, 11 December 2018

“आघाडी सरकारची योजना भाजपाने हाती घेतलीय" - पृथ्वीराज चव्हाणांचा भाजप सरकारला टोला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पूणे

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात 12 लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मेक इन महाराष्ट्रमध्येही 14 हजार एमओयू झाले होते. तसंच मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जनतेला फसवत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

‘मेक इन महाराष्ट्र’मध्ये 14 हजार एमओयू झाले होते, त्यापैकी केवळ 838 प्रकल्प कार्यान्वयित झाले. त्यासाठी 8 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात 6 हजार कोटींची गुंतवणूक झाली, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’बाबत आकडेवारी सादर करत, राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

“उद्योगमंत्री देत असलेली माहिती वेगळी आहे आणि मुख्यमंत्री ट्वीट करत असलेली माहिती वेगळी आहे. प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. आता मॅग्नेटिक महाराष्ट्रमधे 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं म्हटलं आहे. ही धूळफेक आहे. लोकांना दिवास्वप्न दाखवणं सुरु आहे.”, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केल आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमक काय म्हणाले:

मेक इन महाराष्ट्रमध्ये 30 लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळेल, असं आश्वासन दिलं होत.मात्र प्रत्यक्षात फक्त 42 हजार रोजगार केले गेले.

मेक इन महाराष्ट्रमधे झालेली  गुंतवणूक ही कोणत्या गावात, कोणत्या कंपनीने आणि किती रकमेची केली याची माहिती सरकारने द्यावी आणि वेबसाईटवरही प्रसारीत केली.

मेक इन महाराष्ट्रमधून काहीच हाती नाही, म्हणून आघाडी सरकारची 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही घोषणा आताच्या सरकारने घेतली

६१ टक्के MOU कार्यान्वित झाले  असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं

फोक्सकोनच्या गुंतवणुकीचं काय झालं? आणि जनरल मोटोर्सची घोषणा झाली,  घोषणा झाल्यानंतर पुढे काय?

मात्र भाषणात मुख्यमंत्री यांनी ८ लाख कोटींची गुंतवणूक झाल्याचं सांगितलं

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे दीवास्वप्न

मेक इन महाराष्ट्रमध्ये २५१२ MOU झाले केवळ ८३८ कार्यन्वित, ४२ हजार ११६ रोजगार निर्माण झाला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य