Tuesday, 11 December 2018

‘आमची ही लढाई विचारांची आहे आणि विचारांचीच राहील’ - उमा पानसरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. तपास यंत्रणांना मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. मात्र, तरीही मारेकऱ्यांचा शोध घोण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं नाही. तर या हत्या प्रकरणातील दोन संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणा नेमकं काय करतात असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंगळवारी उमा पानसरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक करून पानसरेंच्या हत्ये प्रकरणी तपास यंत्रणांनेचा निषेध केला आहे. त्याच बरोबर तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

kolhapur-morcha1.png

 

 

यावेळी भाजप सरकारवरही त्यांनी कडाडून टीका केली. नुकतेच उच्च न्यायालयाने दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्यानं तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती.

जोपर्यंत मारेकऱ्यांना शोधत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. तसेच, ज्या आरोपींना पकडल गेल त्यांचीही सुटका झाली आहे. आमची ही लढाई विचारांची आहे आणि विचारांचीच राहील, असं ही च्या यावेळी उमा पानसरे यांनी म्हटलं आहे.

kolhapur-morcha2.png

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य