Thursday, 17 January 2019

पोलिसांवर दरोडेखोराच्या टोळीचा चाकूचा हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, सोलापूर

सोलापुरातील खून आणि दरोड्यातील संशयित म्हणून पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात आबू पाशा कुरेशी या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी मोहोळ भागात ही घटना घडली. जखमी पोलिसांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवे तालुक्यात घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, तीन पथके तयार करून मोहोळ शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. रात्री आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले.

या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला चढवला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले. तर रस्यावरून जाणारे आबू कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला आणि काही वेळातच त्याने आपला जीव गमावला. हल्ला करून संशयित दरोडेखोरांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकाला पकडले तर पळालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य