Thursday, 22 February 2018

राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत - शरद पवार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत, असं शरद पवार म्हणाले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

‘राजू शेट्टी आणि माझ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अनेक वेळा मतभेत झाले. सध्या आम्ही दोघेही सत्तेत नाही तरीही, मुंबईत संविधान बचाओ रॅली काढल्यावर मी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन कोणीही माझ्यासमोर आला तर त्याला आम्ही नक्कीच सोबत देऊ’, असं शरद पवार या वेळी बोलले.

'माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते त्या देशभरात पोहचतात' असा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं कोल्हापूरवरचं प्रेम व्यक्त केलं.

सध्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. ते कधी संजय मंडलिक यांचं नाव पुढे करुन जिल्ह्याच्या राजकारणात द्विधावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रतापसिंह जाधव यांनीही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी संजय मंडलिक यांना देण्यासंदर्भातील संकेत शरद पवार यांना दिले.

sharad-pawar.png

Top 10 News

Facebook Likebox

Popular News