Friday, 18 January 2019

बाळ चोरणाऱ्या महिलेच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यामध्ये कामाच्या शोधात आलेल्या दाम्पत्याचे आठ महिन्याचे बाळ पुणे रेल्वे स्टेशवरून पळवणा-या त्या महिलेचे रेखाचित्र अखेर लोहमार्ग पोलिसांनी जारी केले आहे. ही घटना 5 फेब्रुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी महिला बाळाला घेऊन जात असताना कैद झाली होती. त्यावरून लोहमार्ग आरोपी महिलेचे अंदाजे वर्णन रेखाचित्र जारी केलंय.

अक्कलकोट येथून हे पीडित कुटूंब आठ महिन्याच्या मुलीसह 3 फेब्रुवारी रोजी कामाच्या शोधात पुण्यात आले होते. त्यांनी 4 फेब्रुवारी रोजी हडपसर परिसरात एका केटरर्सकडे काम केले. राहण्यासाठी निवारा नसल्यामुळे त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील दर्ग्याजवळ मुक्काम केला होता. त्यावेळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत एका महिलेने त्यांचे बाळ पळवले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य