Friday, 18 January 2019

शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे महापालिका प्रशासनाने खाजगी कार्यक्रमांना शनिवार वाड्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे.

सध्या फक्त अडीच हजार रुपयांमध्ये शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. त्यात वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे.

31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि आज महापालिकेने वृत्तपत्रांमधून तशी जाहिरातीही दिल्या आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य