Friday, 19 January 2018

शिवस्मारकनंतर पुण्यातील शिवसृष्टीचा विषय चर्चेत; राष्ट्रवादीच्या विरोधानंतर भाजपाच्या निर्णयाकडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं कामाला जलपूजनाच्या वर्षभरानंतरही सुरुवात झाली नसताना आता पुण्यातील शिवसृष्टीचा विषयही चर्चेत आलाय.

मेट्रो डेपो की शिवसृष्टी या प्रश्नाचं उत्तर पुणेकरांना मिळालं नसलं तरी. पुणे मेट्रोनं या वादावर तोडगा काढण्यासाठी नवा पर्याय सुचवलाय.

वनाजपर्यंत असलेली पुणे मेट्रो चांदणी चौकापर्यंत नेऊन त्यात शिवसृष्टी नावाचं स्थानक तयार करुन BDP च्या जागेत शिवसृष्टी करण्याचं सत्ताधारी भाजपचं नियोजन आहे..

मात्र BDP च्या जागेला राष्ट्रवादीनं विरोध केल्यानं शिवसृष्टीबाबत भाजप नेमकं काय निर्णय घेणार? याकडे पुणेकरांचं लक्ष आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News