Monday, 22 October 2018

साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना पैलवानांवर काळाचा घाला; सहा जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीतील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडीचालकाचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. या अपघातात पाच पैलवान आणि क्रूझर चालकाला प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान प्रवास करत होते. साताऱ्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून ते क्रूझरने परतत होते.

शिरगाव फाट्याजवळ ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

sangliapghat2.jpg

 

घटना मध्यरात्री घडल्याने काही वेळानंतर या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू झाला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य