Tuesday, 18 December 2018

तब्बल 2 महिन्यानंतर अनिकेतचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील अनिकेतचा मृतदेह दोन महिन्यांनतर कोथळे कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 7 नोव्हेंबर पासून अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीच्या कारणास्तव पोलिसांच्या ताब्यात होता.

मात्र, गुरुवारी सकाळी हा कोथले कुटूंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर हत्येप्रकरणी NIA, CBI या तपास संस्थांसह महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून उत्तर मागवले आहे. सुप्रिम कोर्टाने कलबुर्गी पानसरे आणि दाभोलकर खून तपासातील दिरंगाई विषयी नोटीस काढली.

या प्रकरणाच्या चौकशी संदर्भातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रिम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. प्रसिद्ध लेखक एम.एम.कलबुर्गी यांची 2015 साली गोळ्या गालून हत्या करण्यात आली होती. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस चौकशी झाली नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य