Tuesday, 18 December 2018

जेजुरीमधे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जेजुरी शहरातील मध्यवर्ती भागात भरवस्तीत राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकोर उगडकीस आलाय. पवन राज कुडाळकर या 20 वर्षीय तरुणाने हा प्रकार केला आहे. जेजुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी दिली.

मुलीचे आई, वडील बाजारात भाजी विकण्यासाठी गेले असता घरात ही नऊ वर्षाची  मुलगी आणि तिचा लहान भाऊ घरात एकटेच असल्याचे समजताच शेजारी राहणाऱ्या पवन कुडाळकर याने घरात येवून लहान भावाला 10 रुपये देवून खाऊ आणण्यास बाहेर पाठवले. या एकांताचा फायदा घेऊन मुलीला मोबाईलवर अश्लील दृश दाखवले आणि तिच्यावर अत्याचार केला.

दुपारच्या वेळी जेव्हा मुलीचे वडील घरी आले तेव्हा मुलीने रडतच झालेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांना हा सर्व प्रकार समजल्यावर त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये पवन कुडाळकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

जेजुरी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर  भा.द.वी. 376 तसेच बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार  गुन्हा दाखल केला. भोर विभागाचे पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य