Wednesday, 17 January 2018

राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरातील वाद थेट उपोषणापर्यंत

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

सोलापूर जिल्हयातील राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी नेहमीच विरोधकांशी दोन हात करत त्यांना नामोहरम केलंय. मात्र आता स्वकीयांशीच दोन हात करण्याची वेळ त्यांच्यावर आलीये.

पण, यावेळी निमित्त आहे ते पुतळा उभारणीचं. सध्या कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त याच चौकात शंकरराव मोहिते पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणारे. परंतु याला सदाशिव माने पाटील यांच्या पत्नी, मुलं आणि नातवंडांनी थेट उपोषण करत विरोध केलाय.

47 वर्ष जूना पुतळा आधिच असतांना त्यात आणखी भर कशाला असं म्हणत हा विरोध केला जातोय. त्यामुळे माने पाटील यांनी दर्शवलेला विरोध आता सोलापूर जिल्हयात चर्चेचा विषय बनलाय.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News