Tuesday, 18 December 2018

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरेगाव-भीमा इथं दगडफेक झाली आणि तेथील ग्रामस्थांचं आयुष्यच बदलून गेलं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

1 जानेवारीला भीमा-कोरेगाव इथं दगडफेक झाली आणि तेथील ग्रामस्थांचं आयुष्यच बदलून गेलं. गावात दगफेड, हिंसाचार झाल्यमुळे या ग्रामस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काहींचा तर संपूर्ण संसारचं या हिंसचारात जळून खाक झाला.

या पार्श्वभूमीवर वढू बुद्रुक इथं ग्रामस्थांच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली गेली. या दंगलीमुळे ग्रामस्थांवर झालेला अन्याय आणि मालमत्तेचं नुकसान यासंबंधी वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले.

1 जानेवारीला जो हिंसाचार भीमा-कोरेगावमध्ये झाले त्या घटनेशी आमचा काहीही संबंध नाहीये. दंगली उसळतायेत. धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदाभेद केला जातो आहे. महाराष्ट्र बंद झाला मात्र झालेला प्रकार दुर्दैवी आहे.

काही समाजकंटकांनी केलेल्या कृत्याची फळे आम्ही आत्ताही भोगत आहोत. कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडलीये.

आमच्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आलीये.

loading...

Top 10 News

राशी भविष्य