Saturday, 15 December 2018

लग्नासाठी “तिने” हातावर काढलेली मेहंदी सुकली ही नव्हती; त्याआधीच सगळ संपल अन् तिने जगाचा निरोप घेतला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरीत  लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक  घटना घडलीय. मंगळवारी रात्री ही घटना घडलीय.

  मात्र, तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सीमा सकाटे असं या तरुणीचं नाव असून तिच्या लग्नासाठी 14 डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. काल रात्री सीमा हातावर मेंहदी काढून घरी आली आणि थेट आपल्या खोलीत निघून गेली. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सीमानं खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, या आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून  सध्या पिंपरी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य