Tuesday, 13 November 2018

एसटी वेळेत का सुटत नाही याचा जाब विचारायला गेलेल्या विद्यार्थांना आगार प्रमुखांनी हाकलून दिले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुरंदरच्या सासवड आगाराविरोधात विद्यार्थी संतप्त झालेत. आंबळेमध्ये विद्यार्थ्यांनी सासवड आगाराच्या एसटी अडवल्यात.

सासवड आगाराहून यवत आणि आंबळेसाठी एसटी वेळेत सुटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय.

सासवड आगार व्यवस्थापक आंबळेत येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत गाड्या सोडणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलीये.

दरम्यान 2 दिवसांपूर्वी हे विद्यार्थी आगार प्रमुखांकडे एसटीबाबत विचारणा करण्यास गेले असता, आगार प्रमुखांनी त्यांची समस्या ऐकणं तर दूर त्यांना हाकलून देत बाहेरचा रस्ता दाखवला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य