Sunday, 20 January 2019

दुकानाला लागलेल्या आगीमुळे ATM झाले खाक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्याच्या इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली आहे. या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे.

पुण्यातील वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे. मध्यरात्री या इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता या आगीने एटीएम सेंटरलाही आपल्या कवेत घेतलंय.

ही आग रात्रभर धुमसत होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे.

ही रक्कम नेमकी किती होती हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान गुरुवारीच या एटीएममध्ये पैसे भरले होते, त्यामुळे आगीत लाखोंची रक्कम खाक झाली असावी, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य