Monday, 23 October 2017

दसऱ्याच्या दिवशी भर चौकात हवेत गोळीबार; बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा प्रताप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भर चौकात सिमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे हा गोळीबार राष्ट्रवादीचे नगरसेवक सातव यांनीच केला. गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय.

मात्र, आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचं सांगत आहेत. नगरसेवक सुरज सातव यांच्याकडच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या होत्या. उपस्थितांमध्ये रूबाब दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News