Saturday, 21 July 2018

जनआक्रोश मोर्चा काढत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेचा भाजपवर हल्लाबोल

User Rating: 2 / 5

Star ActiveStar ActiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्रातील आणि राज्यातील  भाजपाच्या अनागोंदी कारभारा विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोलापूर पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं.

मोदी सरकार झोल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नोटबंदी, इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि कर्जमाफीच्या नावानं शेतकऱ्यांची केलेली फसवणूक अशा सगऴ्याच मुद्यांचा समाचार त्यांनी यावेळी घेतला.

काँग्रेस भवनातून निघालेला हा मोर्चा सोलापूर महापालिकेवर येऊन थडकला आणि या मोर्चेचं सभेत रूपांतर झालेलं पहायला मिळांले. विकासाच्या नावाखाली भाजपानं पालिकेची सत्ता मिळवली पण ती सांभाळणं स्थानिक नेत्यांना जमत नसल्यानं शहराचा विकास खुंटला असा प्रहार त्यांनी बोलतांना केला.

loading...

Top 10 News

Facebook Likebox