Tuesday, 13 November 2018

कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा एकवटला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

राज्यात शेतकरी कर्जमाफी जाहिर केल्यानंतरही शेतकरी कर्जातून मुक्त झालेला नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आंदोलनात आणखी एक भर पडली आहे.

 

पुण्याच्या राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज 100% माफ व्हावं, शेतीमालाला भाव मिळावा आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करावी, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग असून महिला रस्त्यावर चूल मांडून आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.  

loading...

Top 10 News

राशी भविष्य