Sunday, 19 August 2018

गांधी जयंतीनिमित्ताने नागपुरात स्वच्छता ट्रेन, तर पुण्यात स्वच्छता वारी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

  जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

 

2 ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी पुण्यात स्वच्छता वारी काढण्यात आली. खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने गांधी जयंतिनिमित्त सोमवारी सकाळी 7.30 वाजता स्वच्छता वारी हे विशेष अभियान राबविण्यात आले.

 

कात्रज चौक ते अभिनव विद्यालय या 4 किमी दरम्यानचा रस्ता लोकसहभागातून स्वच्छ करण्यात आला. घरच्या स्वच्छतेसोबतच आपल्या सार्वजनिक स्वच्छतेचेही महत्व तितकेच आहे. अस्वच्छतेने होणाऱ्या साथीच्या रोगांनी सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, यांसारख्या रोगांनी अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या प्रकारचीी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे मनपा, आदर पुनावाला फाउंडेशन, स्वच्छ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

नागपुरमध्ये इतवारी ते आमगाव स्वच्छता ट्रेन काढण्यात आली. यामध्ये तरुणांनी पथनाट्य सादर करुन स्वच्छतेचे संदेश दिले.

loading...

Top 10 News

Facebook Likebox