Sunday, 19 August 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान शिर्डीत साई बाबांच्या  दर्शनासाठी त्यांचे  भक्त कानाकोपऱ्यातून येत असतात.  त्यामुळे शिर्डीत विमानतळ असावे अशी  मागणी केली जात होती.  

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रपती हे सहपत्नीक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. साईबाबा समाधी शताब्दी महाउत्सवाचा ध्वजारोहण देखील महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते झाला.

 

राज्यपाल सी विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विमानतळावर राष्ट्रपती कोविंद यांचे स्वागत केले. मागील आठवड्यात अहमदनगरमधील शिर्डी विमानतळाचा व्यावसायिक वापर करण्यास हवाई वाहतूक महासंचालनालने (डीजीसीए) परवानगी दिली होती.


मुंबईपासून २३८ किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टकडून साईबाबा समाधी महोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

 

राज्यपाल सी विद्यासागर राव तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांव्यतिरिक्त नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

loading...

Top 10 News

Facebook Likebox