Saturday, 21 July 2018

छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचे पुत्र वीर प्रतापसिंह राजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पुजन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या सातारच्या राज गादीला समाजकारण आणि राजकारणात मोठं स्थान आहे.

 

छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र छत्रपती शाहू यांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी घोषीत केली होती. या शुभ दिनानंतर दरवर्षी विजयादशमीला सिमोल्लंघनाची शाही मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

 

यावर्षीही जलमंदिर पॅलेस ते भवानी देवी मंदिरापर्यंत सिमोल्लंघणाची शाही मिरवणूक काढण्यात आली.

 

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचे पुत्र वीर प्रतापसिंह राजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचं पुजन करण्यात आले.

 

तर, या भव्य मिरवणुकीला सातारकरांनीही मोठ्या संख्येनं सहभाग दर्शवला.

loading...

Top 10 News

Facebook Likebox