Monday, 23 October 2017

उदयनराजेंनी थेट टोलनाक्यावर एण्ट्री केल्याने सातारा-पुणे महामार्ग जाम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढलं तर अंदोलन करु असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आणेवाडी टोलनाक्यावरील व्यवस्थापनाला दिला आहे.

 

सध्या असलेल्या व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हा टोल नाका जाणार आहे.

 

त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना काढून नवी भरती होणार आहे. याला सध्याच्या टोल कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

 

त्यामुळेच खासदार उदयनराजेंनी टोल कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन, टोल प्रशासनाला चांगलंच सुनावले. थेट उदयनराजेंनी टोलनाक्यावर एण्ट्री केल्याने, सातारा-पुणे महामार्ग जाम झाला होता.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News