Wednesday, 23 January 2019

धक्कादायक! आयफोनसाठी ‘त्याने’ विकली स्वतःची किडनी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मोबाइलचे व्यसन लागल्याने तरुण पिढीला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असतानाच चीनमधील एका तरुणाने आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या तरुणाने किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. पण आता या तरुणाला त्याची चूक लक्षात आली असून तो गेल्या 7 वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडल्याने मरण यातना भोगत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या जिओ वँग नावाच्या एका तरुणाने 7 वर्षापूर्वी 'आयफोन-4' खरेदी करण्यासाठी स्वतःची किडनी विकली होती.

ज्यावेळी 'आयफोन-4' लाँच झाला त्यावेळी जिओ वँग अवघ्या 17 वर्षाचा होता. आणि तो विद्यार्थी होता. त्यावेळी शाळेत आयफोन म्हणजे प्रतिष्ठा समजली जात होती. आयफोन विकत घेवून मित्रांमध्ये शायनिंग मारण्यासाठी त्याने किडनी विकण्याचा निर्णय घेतला.

वँगने एक किडनी 3,200 अमेरिकन डॉलरला म्हणजेच 2,23,265 रुपयांना विकली, आणि त्यातूनच त्याने आयफोन-4 खरेदी केला. हा तरूण आता 24 वर्षाचा आहे. एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आठवडाभरानंतर तो पूर्वीसारखाच तंदुरुस्त होईल, असे वँगला सांगण्यात आले होते. पण दुर्दैवाने त्याला किडनीची शस्त्रक्रिया करताना संसर्ग झाला.

त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून तो अंथरुनाला खिळून पडला आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आता त्याच्या कुटुंबाकडे पैसेही नाहीत. कुटुंबाने बराच खर्च केल्याने तेही कर्जबाजारी झाले आहेत. विशेष म्हणजे वँगने याबाबत कुटुंबाला काहीही माहिती दिली नव्हती.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य