Wednesday, 23 January 2019

हत्या करुन पत्नीला जिवंत ठेवण्यासाठी त्याने केले ‘असे’ काही

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गोरखपूरमधील डॉक्टर धर्मेंद्र प्रताप सिंह याने त्याच्या दुसऱ्या पत्नीची हत्या करून नंतर ही हत्या लपवण्यासाठी तिचे फेसबुक प्रोफाइल 3 महिने अपडेट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या डॉक्टरने हत्येची कबुली देईपर्यंत मृत महिलेच्या कुटुंबीयांना ती जीवंत असून आसाममध्ये राहत आहे, असे वाटत होते. राखी श्रीवास्तव असे मृत महिलेचे नाव आहे.

 

gorkhpur-wifemurder.png

 

नेमकं काय घडलं ?

  • 2006 मध्ये मृत महिला आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंहला भेटली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले.
  • धर्मेंद्र विवाहित आहे हे माहीत असूनही राखी त्याच्या प्रेमात होती. सिंहने तिच्यासाठी शहापूरमध्ये बंगलाही घेतला होता.
  • कुणालाही न सांगता 2011 मध्ये गोंडा येथे ते विवाहबद्ध झाले.
  • पण 2015 मध्ये या प्रकरणाची माहिती धर्मेंद्रची पहिली पत्नी उषाला समजली. तिने राखीशी असलेले सगळे संबंध तोडण्याची सक्ती धर्मेंद्रला केली. पण धर्मेंद्रने न ऐकल्याने दोघे वेगळे झाले.
  • 2016 मध्ये राखी मनीष सिंहच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी कायदेशीर पद्धतीने लग्न केले. मात्र, त्यानंतरही राखी धर्मेंद्रच्या संपर्कात होती.
  • शहापूरचा बंगला माझ्या नावावर कर नाही तर तुझा खरा चेहरा जगासमोर आणेन अशी धमकी तिने त्याला दिली.
  • राखी आपल्या दुसऱ्या पतीसोबत नेपाळला फिरायला गेली होती. मनीष भारतात लवकर परतला पण राखी मात्र काही कारणांनी नेपाळमध्येच थांबली.
  • तिथे धर्मेंद्र सिंहच्या 2 साथीदारांनी तिची भेट घेतली. तिला ज्यूसमधून गुंगीचे औषध देऊन तिला पोखराच्या दरीत ढकलून दिले.
  • त्यानंतर हे दोन्ही साथीदार मोबाइल घेऊन गुवाहाटीला गेले. तिथूनच ते 3 महिने तिचे फेसबुक अकाउंट अपडेट करत होते.

राखी गोरखपूरला परतली नाही म्हणून तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच, तिचा पती मनीष सिंह याच्यावर संशय असल्याचेही स्पष्ट केले. पण मनीष निर्दोष असल्याचे कळल्यावर पोलिसांनी धर्मेंद्रची चौकशी केली. त्याची खूप कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली. यूपी पोलिसांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने राखी श्रीवास्तव हिचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या हवाली केला. पोलिसांनी धर्मेंद्र आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य