Wednesday, 23 January 2019

माझा जन्म पाकिस्तानात झाला असता तर बरं झालं असतं - सोनू निगम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'मी भारतापेक्षा पाकिस्तानात जन्मलो असतो तर बरं झालं असतं,' असं सोनू निगमने म्हटलं आहे. भारतीय गायकांसोबत होणाऱ्या दुजाभावाबद्दल या वक्तव्याद्वारे त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्या देशात भारतीय गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपन्याना पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही पैसे दिले नाही तर ते तुमचे गाणे वाजवणार नाही. त्यासोबतच तुम्हाला गाणंही मिळू देणार नाही. पण पाकिस्तानी गायकांसोबत असे केले जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाही. मग भारतीय गायकांसोबतच असा दुजाभाव का? अशी खंत सोनू निगमने एका मुलाखती दरम्यान व्यक्त केली.

सोनूने भारतीय गायकांच्या समस्यांची यादीच समोर ठेवली. तसेच तो म्हणाला, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा माझ्या छोट्या भावासारखा आहे. तो गातो ही चांगला, पण म्यूझिक कंपन्या त्याच्याकडून पैसे घेत नाहीत. गाण्यासाठी पैसे दे, असे राहत फतेह अली खानला कोणी म्हणत नाही. मी पाकिस्तानी गायकांची यादी देऊ शकतो ज्यांच्याकडून पैसे घेतले जात नाही.

त्यामुळे मला असे वाटते की माझा जन्म भारतापेक्षा पाकिस्तानात झाला असता बरं झालं असतं. कारण मला भारतात चांगले काम मिळाले असते, तसेच माझ्याकडून पैसेही घेतले गेले नसते. आपल्या या वक्तव्यामुळे सध्या सोनू निगम सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य