Wednesday, 23 January 2019

...अन् संसदेच्या सुरक्षारक्षकांची झाली पळापळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी संसद भवन परिसरात एका खासगी टॅक्सीने बॅरिकेडला धडक दिल्याने संसद परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा जवान सतर्क झाले आणि या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे संसद भवन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे 17 वर्षांपूर्वी झालेल्या संसदेवरील हल्ल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. मात्र ही खासगी कार एका खासदाराची असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

नेमकं काय घडलं ?

  • संसद भवनाबाहेरच्या बॅरिकेड्सला खासगी कार धडकल्याची माहिती मिळाल्यानंतर संसद परिसरातील सर्वच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले.
  • सीआरपीएफच्या क्विक अॅक्शन टीमने संसदेच्या गेटवर तात्काळ पोझिशन घेतली आणि प्रवेशद्वाराला संपूर्णपणे घेराव घातला.
  • त्यानंतर जवानांनी कारची तपासणी केली. यामध्ये ही कार खासगी टॅक्सी असल्याचे समोर आले.
  • या कारमधून काही खासदार प्रवास करत होते. त्यानंतर जारी करण्यात आलेला अलर्टही रद्द करण्यात आला. 
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य