Monday, 17 December 2018

श्रीलंकेत पावसाचं थैमान, 91 जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, श्रीलंका

 

भारतामध्ये पावसाची वाट पाहणं सुरु असतानाच तिकडे श्रीलंकेत मात्र पावसानं थैमान घातलं. मान्सूननं पहिल्याच पावसामध्ये श्रीलंकेला मोठा तडाखा दिला.

 

श्रीलंकेत तुफानी पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलन यामुळे तब्बल 91 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले.

 

मुसळधार पावसाने श्रीलंकेतल्या अनेक शहरांचं जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान श्रीलंकेला भारताने मदतीचा हात पुढे केला. भारतीय नौदलाने बंगालच्या खाडीत असलेली आपली युद्धनौका आयएनएस किर्च ही कोलंबोच्या दिशेने रवाना केली.

 

या युद्धनौकेद्वारे पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचं साहित्य पाठवण्यात आलं. शिवाय औषधे, कपडे, आणि पिण्याचं पाणीही पाठवण्यात आलं.

loading...

Top 10 News

राशी भविष्य