Friday, 18 January 2019

ऐन दिवाळीतच महागला LPG सिलिंडर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ऐन दिवाळीच्या तोंडावर अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किमतीत 2.94 रुपयांची वाढ केली. त्यामुळे सिलिंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून, आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलिंडरचे किंमतीत जूनपासून आतापर्यंत सहाव्यांदा वाढ झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलिंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

जागतिक किमतीतील वाढ आणि रुपयाची बिघडत या स्थितीमुळे विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत 60 रुपयांनी वाढली आहे. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना जीएसटीमुळे 2.94 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

अनुदानित ग्राहकांना सरकार वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर उपलब्ध करून देते. अनुदानाची ही रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. ऐन दिवाळीच्या सुरुवातीलच सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य