Friday, 18 January 2019

इंडोनेशिया विमान दुर्घटना: विमानाचे सापडले तुकडे, सर्वांना जलसमाधी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जकार्ताहून उड्डाण केलेल्या लायन एअरवेजच्या जेटी 610 विमानाचा उड्डाणानंतर 13 मिनिटातच संपर्क तुटल्यानंतर या विमानाचा शोध सुरू झाला होता, मात्र इंडोनेशियामध्ये बेपत्ता झालेल्या या प्रवासी विमानाला अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

188 प्रवासी घेऊन उड्डाण केलेलं विमान समुद्रात कोसळले आहे. इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं जेटी 610 हे विमान इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पिनांगला निघाले होते.

या विमानाचा अपघात झाला की यामागे काही घातपात आहे हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

बचाव पथकांना या विमानाचे अवशेष तुकड्यांमध्ये सापडले आहेत. समुद्रात विमानाचा ढिगारा आणि प्रवाशांच्या वस्तूंनी एक थर साचला आहे. अपघात इतका भीषण होता की त्यातील एकाही प्रवाशाचे मृतदेह सापडलेले नाही. सर्वांना या समुद्रात जलसमाधी मिळाली असंच म्हणावे लागेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य