Monday, 10 December 2018

फळांच्या राजाच्या शिरपेचात 'हा' मानाचा तुरा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

'फळांचा राजा 'हापूस' आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. मानांकनामुळे हापूसची ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे'.केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लगतच्या परिसरातील हापूसला मिळालेले हे भौगोलिक मानांकन उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे. त्यानुसार त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता त्यांच्या भौगोलिक स्थानावरून ओळखली जाते. केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने हापूस आंब्यास मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.

या मानांकनामुळे कोकणलगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येता येणार नाही. तसेच विक्री करताना हापूस असा उल्लेख यापूढे करता येणार नाही. याआधी हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जात होता. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती आणि कोकणातील उत्पादकांचेही नुकसान प्रचंड होत होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य