Wednesday, 16 January 2019

पाहा : केरळमधील पूरपरिस्थिती, सर्वाधिक मदत महाराष्ट्राकडून...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
 
गेले आठ दिवसांपासून केरळ राज्यात पावसान थैमान घातले यामुळे केरळमधील जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे. 10 लाखाच्यावर लोक शिबिरात राहत आहेत. पुरामुळे तेथील लोकांचं आरोग्य धोक्यात आले आहे.
 
महाराष्ट्र शासनाने 20 कोटी रूपयांची मदत तर दिलीच पण त्याच बरोबर कपडे आणि अन्न पुरवठा सुद्धा केला आहे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली औषधोपचार करण्यासाठी 100 डॉक्टरांचे पथक आणि  गोळ्या औषधांचासाठा रवाना करण्यात आला आहे.
 
यासाठी लष्कराचे दोन विमान केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉक्टरांची आवश्यकता भासल्यास अजून डॉक्टर पाठवू असे गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.
 
पाहा केरळमधील सध्याची पूरपरिस्थिती 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य