Wednesday, 16 January 2019

राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त दिग्गजांनी वाहिली आदरांजली...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आज 74व्याजयंतीनिमित्त नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी आदरांजली वाहिली.

यानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. 

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत हे यावेळी उपस्थित होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली.

राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.

इंदिरा गांधींची हत्या ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झाली. राजीव गांधी राजकारणात येऊन वर्ष-दोन वर्षे होत नाहीत तोच हा एक प्रचंड आघात त्यांच्यावर झाला. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी राजीव गांधींच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे आली. पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या करण्यात आली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य