Wednesday, 16 January 2019

पूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पूरग्रस्त केरळला आता देशभरातून मदत मिळत आहे. पंजाबपाठोपाठ दिल्ली सरकारतर्फेही केरळमधील पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांच्या मंत्रीमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला.
या बैठकीला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात केजरीवाल यांनी ट्वीटही करून इतरांनाही मदतीसाठी आवाहन केलं आहे.
"मी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दिल्ली सरकार 10 कोटी रुपयांची मदत देत आहे. मी केरळच्या बंधू भगिनींसाठी उदार मनाने दान करण्याचं आवाहन करतो." असं या ट्वीटमध्ये केजरीवाल यांनी म्हटलंय.

दिल्लीच्या सर्व जिल्ह्यातील एसडीएम ऑफिसमध्ये डोनेशन सेंटरही उघडण्यात आले आहे. य़ाच्या माध्यमातून केरळच्या नागरिकांना मदत करण्यात येणार आहे.

1924 नंतरचा हा केरळमधील हा सर्वात मोठा पूर आहे. या पुरामध्ये आत्तापर्यंत सुमारे 2 लाख नागरीक बेघर झाले आहेत. तसंच केरळमधील कोची विमानतळही पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. यामुळे 26 ऑगस्टपर्यंत हा एयरपोर्ट बंद ठेवण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या

केरळमध्ये गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण पूर

पूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट...

केरळमध्ये जलप्रलय , सेलिब्रेटींच्या ट्विटरवरुन प्रतिक्रिया...

केरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य