Tuesday, 18 December 2018

#kikichallenge पडतोय महागात...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या 'ब्लू व्हेल' चॅलेंजनंतर आणखी एक ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'ब्लू व्हेल' या गेममध्ये देण्यात आलेलं चॅलेंज पूर्ण करताना अनेक मुलांनी आपला जीव गमावला होता. किकी चॅलेंज जगभरात व्हायरल होत असून लोकांनी उत्साहाच्या भरात हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी काहीही करायला सुरुवात केली आहे. या चॅलेंजमुळे अनेक जीवघेणे अपघातही घडले आहेत.

ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. म्हणजे ती व्यक्ति डान्स करत करत गाडीसोबतच पुढे जाते. 'किकी चॅलेंज' (Kiki Challenge) या नावाने हा ट्रेंन्ड व्हायरल होत आहे. परंतु यामध्ये जीवाला धोका आहे, तरीही अनेक लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. सामान्य लोकांसह बॉलिवूड सेलिब्रिटींही किकी चॅलेंज पूर्ण करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. तसेच हे चॅलेंज करत असताना घडून आलेल्या आपघातांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दुबई पोलिसांनी किकी चॅलेंजला वॉर्निंग दिली असून दुबईमध्ये किकी चॅलेंज बॅन करण्यात आले आहे. आबुधाबी पोलिसांनकडून तीन सोशल मीडिया यूजर्सना किकी डान्स करण्यासाठी अटकही केली आहे. सर्वात आधी हे चॅलेंज खास करून अमेरिका, यूरोप, इजिप्त, जॉर्डन आणि यूएईमध्ये व्हायरल होत होतं. यानंतर आता भारतातही या चॅलेंजने धुमाकूळ घातला असून याबाबत पोलिसांनी दखल घेण्यास सुरुवात केली आहे.

बॉलिवूडकरांचं किकी चॅलेंज -

जगभरात गाजणारं किकी चॅलेंज पूर्ण करण्यास बॉलिवूडकरांनीही सुरुवात केली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी या चॅलेंजमध्ये उतरले असून त्यांनी आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेता मनिष पाॅल याने किकि चॅलेंज करताना त्याची काळजी घेऊन करा असं आवाहन करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यामध्ये नोरा फतेही, अभिनेत्री अदा शर्मा आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली करिश्मा शर्मा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य