Sunday, 20 January 2019

शरीफ, मरियम पाकिस्तानात पोहचताच अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांंना लाहोर विमानतळावर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्यांच्या अटकेआधी पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला असून लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत.

काही ठिकाणी हिंसकवळण आले असून पोलिसांनी 378 जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, लाहोर विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

  • नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली
  • मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड
  • तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली 
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य