Sunday, 20 January 2019

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, श्रीनगर

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. बालटाल मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाल्याने पाच भाविकांचा यात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

बालटाल मार्गावर रेलपतरी आणि बाररारीमर्गदरम्यान भूस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला वेग-वेगळ्या कारणांमुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. याआधी बीएसएफच्या एक अधिकारी, एक स्वयंसेवक आणि एक पालकी वाहकाचा देखील मृत्यू झाला होता.

अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू झाली आहे. ही यात्रा 60 दिवस चालणार आहे. यात्रेच्या पाचव्या दिवशी सोमवारी सर्वाधिक 22,500 यात्रेकरूंनी दर्शन घेतले. आतापर्यंत 36,366 भाविकांनी दर्शन घेतले आहे. 

राज्यात 20 जूनला राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह पहिल्यांदा बुधवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर श्रीनगर येथे पोहोचले. ते अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. 

  • भूस्खलनात यात्रेत सहभागी झालेले सात यात्रेकरू मलब्याखाली दबले.
  • घटनास्थळी उपस्थीत असलेल्या मदत पथकाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले.
  • मलब्यातून काढण्यापूर्वीच तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
  • मृत्यू झालेल्या लोकांची ओळख अजून पटलेली नाही.
  • त्यांना पालटाल येथील रूग्णालयात आणण्यात आले.
  • अमरनाथ यात्रेतदरम्यान यावर्षी मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य