Tuesday, 20 November 2018

सुषमा स्वराज झाल्या पुन्हा ट्रोल, पती स्वराज कौशल यांनाही खेचले मैदानात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या पुन्हा ट्रोल झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांच्या पतीलाही ओढले आहे. स्वराज या मुस्लिम अनुनय करत असल्याचा आरोप या ट्रोलनी केला आहे. एका ट्विटर युजरने सुषमा यांचे पती स्वराज कौशल यांना ट्विट केलं. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट करून ट्विटर खात्यावर एक स्क्रीनशॉट पोस्ट केला.

त्यात असं लिहलं होतं की, 'आज रात्री जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा आणि समज द्या की मुस्लिमांमध्ये मतभेद करू नये. मुस्लिम लोक भाजपला मतदान नाही करणार.'

tweet.png

 

सुषमाच्या पतीने यावर भावूक उत्तर दिले आहे की या शब्दांनी त्यांच्या कुटुंबाला असह्य वेदना दिल्या आहेत. सुषमाचे पती कौशल स्वराज यांनी ट्विट केले, "आपल्या शब्दांनी आम्हाला असह्य त्रास दिला आहे. 1993 मध्ये माझ्या आईचे कर्करोगाने निधन झाल्याचे मला एक आठवत आहे. सुषमा संसद सदस्य आणि माजी शिक्षण मंत्री होत्या. माझ्या आईसाठी त्या रुग्णालयात एक वर्षासाठी राहिल्या होत्या. त्यांनी वैद्यकीय सेवकाला घेण्यास नकार दिला आणि माझी मृत आईची काळजी स्वत: त्यांनी घेतली. '

sushma.png

 

स्वराज यांनी शेअर केलेलं हे ट्विट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील लाईक केलं आहे. त्याचबरोबर असं ट्विट करणाऱ्या मुकेश गुप्ताचं आणखी एक ट्विट सुषमा यांनी लाईक केलं आहे.

'काही ना काही करून सुषमा स्वराज यांना सुधारायला हवं. त्यांना हे दाखवून द्यायला हवं की मुस्लिम त्यांना निवडूण देणार नाहीत. गव्हर्नर हा केवळ तुम्ही करू शकता. त्यामुळे पुढे चला, त्यांना फिक्स करा. करोडो भारतीयांचे आशिर्वाद तुम्हाला मिळतील.'

tweet2.png

आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या एका जोडप्याला पासपोर्ट नाकारण्यावरून निर्माण झालेल्या वादावरून स्वराज यांना काही दिवसांपूर्वी ट्रोल करून शिविगाळ करण्यात आली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्या वादात लखनौमधील पासपोर्ट सेवा केंद्राचे अधिकारी विकास मिश्रा यांची बदली करण्यात आली होती. मिश्रा यांनी मुस्लिम पतीला हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगितल्याचा आरोप या जोडप्याने केला होता.

पासपोर्टप्रकरणी सुषमा स्वराज झाल्या ट्रोल अन् केले रिट्विट

 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य