Tuesday, 20 November 2018

आजपासून सौदी अरेबियात महिलांच्या हातात स्टेरिंग...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महिलांना वाहनं चालवण्यास परवानगी नसलेला जगातील एकमेव असा देश म्हणजे सौदी अरेबिया. मात्र आजचा दिवस म्हणजेच रविवार 24 जून हा सौदी अरेबियासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवत महिलांना दिलासा दिला.

वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन लायसन्स असलेल्या महिलांना आता सौदीमध्ये वाहनं चालवता येणार आहेत. या निर्णयामुळे महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देऊन लायसन्स दिले गेले होते. लायसन्स मिळाल्यानंतर अनेक महिलां आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या. याआधी सौदीतील महिलांना बाहेर पडताना नातेवाईक, टॅक्सी चालक यांसारख्या अनेक जणांची मदत घ्यावी लागायची. मात्र आता सौदीतील महिला स्वत: ड्राइव्ह करु शकणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य