Saturday, 15 December 2018

भाजपने पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर मेहबुबा मुफ्तीचा राजीनामा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला,यामुळे जम्मू काश्मीरमधील सरकारला मोठा धक्का बसला आहे. भाजपने जम्मू - काश्मीरमधील पीडीपीतील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा मागे घेतला असून, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी मंगळवारी राजीनामा दिला.

या दोन्ही पक्षांची सोबत अवघे 3 वर्षे टिकली आहे. ज्या उद्देशाने युती जोडली गेली होती ते हेतू पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत, जम्मू - काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडलं आहे.

भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे. मेहबुबा यांनी सायंकाळी 4 वाजता पक्षाची बैठक बोलावली. आणि त्यांनीही राज्यपालांकडे राजीनामा दिला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य