Sunday, 20 January 2019

एका लग्नपत्रिकेची दुसरी गोष्ट, पत्रिकेच्या माध्यमातून अनोखा संदेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लखनऊ

आपल्या देशात अनेक धर्म व जातींचा समावेश आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माची एक वेगळी ओळख आणि संस्कृती आसते. त्याचाच एक भाग म्हणजे विवाह सोहळा याचीही प्रत्येक धर्मात एक वेगळी परंपरा असते. त्याचाच एक भाग म्हणजे लग्नपत्रिका,

विवाह सोहळ्यात लग्नपत्रिका ही प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळी असते, प्रत्येक लग्न पत्रिकेवर आपल्या धर्मातील देवांचा उल्लेख असतो मात्र उत्तर प्रदेशातील एक असं मुस्लिम कुटुंब आहे, ज्यांच्या लग्नपत्रिकेत दिसले चक्क प्रभू रामचंद्र आणि सीता.

सुलतानपूरच्या बघसराई गावातील मोहम्मद सलीम यांच्या मुलीच्या लग्नाची ही पत्रिका आहे, त्यांनी आपल्या हिंदू मित्रांना पाठवलेल्या लग्नपत्रिकेत श्रीराम आणि सीतेचा फोटो छापला आहे. इतकंच नव्हे, तर हिंदू लग्नपत्रिकेप्रमाणे या पत्रिकेवर कलश, केळीची पानं आणि पुजेची थाळीही दिसत आहे.

हिंदू-मुस्लिम हा धार्मिक तिढा सोडवण्यासाठी सलीम यांनी हा पुढाकार घेतला आहे, त्यांनी आपल्याच घरातून याची सुरुवात करत इतरांना हा मार्ग दाखवला आहे. धार्मिक सलोख्यासाठी त्यांनी सर्वांना एक अनोखा संदेश दिला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य