Sunday, 16 December 2018

अचानक झालेल्या वादळी पावसानं देशात नुकसानं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

उत्तरांखडमध्ये तुफान पाऊस पडत असून, या तुफान पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाली आहे. चमोली जिल्हातील नारायणबगडमध्ये ढगफुटीमुळे अनेक दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयाग-ग्वालदम हायवे काही काळ बंद होता. तुफान पावसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. पावसामुळे डोंगराचे कडे कोसळून, मोठ्या प्रमाणात माती, मलबा वाहून येत आहे. त्यामुळेच कर्णप्रयाग-ग्वालदम महामार्ग बंद ठेवण्यात आला, तर हायवेवरील काही वाहने पावसात अडकली आहेत.

अचानक आलेल्या या पावसामुळे उत्तर भारतातही हाहा:कार उडाला असून. गेल्या 24 तासात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.

पंजाबमधील अमृतसर आणि राजस्थानमधील अलवरमध्ये पावसाने मोठं नुकसान झालं आहे. अमृतसरमध्ये काढणी झालेली पीकं, धान्य भिजली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याची भावना इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य