Saturday, 15 December 2018

सीरियावर अमेरिकेचा हवाई हल्ला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई हल्ल्यांच्या आदेशानंतर सीरियातील दमिश्कजवळ स्फोटाचा आवाजही ऐकू आला. अमेरिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियाविरूद्ध कारवाई करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केला जातो आहे. तसेच हल्ल्यासाठी बॉम्बचाही वापर होतो आहे. दुसरीकडे, रशियानेही अमेरिकेला मिसाईल हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.

'सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद’ यांच्या रासायनिक हल्ल्याला लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला दिले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना म्हणाले. 'फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य