वृत्तसंस्था, पटना
‘इलेक्ट्रीक हाय-स्पीड लोकोमोटिवची क्षमता 12 हजार हॉर्सपावर इतकी असून त्यामुळे 120 किलोमीटर प्रतितास एवढा रेल्वेचा वेग असणार आहे. या लोकोमोटिवमध्ये 6 हजार टन वजन खेचण्याची क्षमता आहे.
मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील 11 वर्षांमध्ये अशाप्रकारचे 800 इंजिन बनवणार असून त्यावर 20 हजार कोटींहून जास्त खर्च होणार आहे.
प्रत्येक इलेक्ट्रीक लोकोमोटिव इंजिनला बनवण्यासाठी 25 कोटी रूपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.