Sunday, 20 January 2019

अमित शहांची रणनीती मायावतींना झटका देणार ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

आज देशभरातील राज्यसभेच्या 25 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष्य उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या एका जागेवर लागले आहे. कारण येथे बसपा आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळतेय. त्यातच बसपाच्या एका आमदाराने क्रॉस वोटिंग केल्याने मायावतींच्या अडचणीत भर पडली आहे.

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांपैकी 8 जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातोय. तर एक जागा अखिलेश यादवांच्या सपाकडे जाईल. भाजपने आपला नववा उमेदवार मैदानात उतरवल्याने उरलेल्या एका जागेवर बसपासमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच आता बसपाच्या एका आमदाराने आपण भाजपला मतदान केल्याचे सांगितल्याने मायावतींना जोरदार धक्का बसलाय. ही जागा जिंकण्यासाठी मायावतींसाठी समाजवादी पक्षाची मदत महत्वाची ठरणार आहे.

परंतु या जागेवर मायावतींना पराभूत करण्यासाठी भाजप अध्यक्षांनीच कंबर कसल्याने या जागेची रंगत वाढली आहे.

फुलपूर आणि गोरखपूरमध्ये झालेल्या निवडणूकीत मायावतींनी सपाच्या उमेदवारांना मदत केली होती. म्हणूनच आता या निवडणूकीत समाजवादी पक्षाने मायावतींना मदतीचे आश्वासन दिले आहे. या मदतीनंतरही जर या जागेवर मायावतींना विजय मिळवता न आल्यास त्यांच्यासाठी ही मोठी नामुष्की ठरू शकते.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य