Monday, 17 December 2018

राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संपूर्ण जगाच लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मश्जिद भूमी वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात (आज) बुधवारी दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, अशोक भूषण, एस. अब्दुल नजीर यांच्या बेंचसमोर ही सुनावनी होईल.

काही दस्ताऐवाजांचा अनुवाद झालेला नाही, असं गेल्या सुनावणीत कोर्टाच्या लक्षात आलं होतं. हा अनुवाद आता पूर्ण झालाय का, याची खातरजमा आज कोर्ट करणार आहे. अनुवादाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारकडे होती.

आतापर्यंत हिंदी, उर्दू, अरबी, फ़ारसी, संस्कृतसह 7 भाषातील सुमारे 10 हजार दस्ताऐवज उत्तरप्रदेश सरकारकडून इंग्रजी भाषांतर करून घेण्यात आलेय. गेल्या सुनावणी वेळी रामायण, रामचरितमानस, गीतेचे इंग्रजी अनुवाद 2 आठवड्यात करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

आज सुप्रीम कोर्टात काय होणार ?

- इलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010साली दिलेल्या निकाला विरुद्ध 13 याचिका दाखल झाल्या आहेत

- अयोध्येतील 2.77 एकर वादग्रस्त जमीन तिन्ही पक्षकारांना समसमान वाटप करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

- सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाड़ा आणि रामलला या तिघात समान जमीन वाटप करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात दाद मागितली गेलीये.

- बुधवारी सर्वप्रथम उर्वरित सर्व दस्ताऐवजांचे अनुवाद झाले आहे का याची खातरजमा सुप्रीम कोर्ट करणार

- त्यानंतर सर्व पक्षकार मिळून कुठल्या मुद्द्यानवर वादविवाद करायचा हे निश्चित केल जाईल

loading...

Top 10 News

राशी भविष्य