Monday, 21 January 2019

भारत आणि फ्रान्समध्ये 'या'14 महत्वपूर्ण करारांवर शिक्का मोर्तब

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या भेटीत 14 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नौदल, आण्विक शिक्षण, रेल्वे, संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, स्मार्ट सिटी तसेच अनेक करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बोलताना फ्रान्ससोबत भारताच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेखही केला. जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी फ्रान्सची भारताला मदत होत असते असं त्यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संरक्षण, सुरक्षा, अंतराळ व तंत्रज्ञानात भारत व फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रदीर्घ वारसा दिसून येतो. भारत आणि फ्रान्समधले सांस्कृतिक संबंध हे इतिहासापासून आहेत. सरकार कोणतेही असो दोन्ही देशाचे संबंध नेहमीच चांगले आहेत.”

तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांनी फ्रान्स-भारत सर्वोत्कृष्ट भागीदार असल्याचं सांगितलं. संरक्षण, संशोधन तसेच विज्ञान त्यातही तरुणांना उच्च शिक्षण-प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करतील. शिवाय, सामरिक क्षेत्रात भागीदारीचे नवे युग सुरु करण्याचा आमचा उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य