Monday, 17 December 2018

रेल्वे प्रवासाचा प्लॅन रद्द झाला तरी आता प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी. आता तुमच्याकडे जर रेल्वेने प्रवास करण्याच कन्फर्म तिकीट असेल, आणि अचानक तुमचा लांबचा प्रवास रद्द झाला, तर तम्ही तुमच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला त्या तिकीटावर प्रवास करायला देऊ शकता.

ऐनवेळी काही कारणास्तव तुम्ही प्रवासाचा प्लॅन फसला तर आता तुमचे तिकीटाचे पैसे वाया जाणार नाहीत हे नक्की. कारण तुम्ही आपलं तिकीट आता दुसऱ्या प्रवाशाच्या नावे ट्रान्सफर करु शकता.

तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला मित्र परिवाराला ते तिकीट देऊ करू शकता. परंतू त्यासाठी देखील काही अटी असणार आहेत. तुम्हाला 24 तास अगोदर संबंधित व्यक्तीच्या नावे अर्ज करावा लागेल. आणि काहूी कागदी कामे पूर्ण करावी लागतील. तिकिटावरील नाव बदलण्याचा अधिकार हा तुमच्या कडे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावे करु शकता.

loading...

Top 10 News

राशी भविष्य