Sunday, 18 March 2018

एका ट्विटने तब्बल 65 किलो वजन घटले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मध्य प्रदेश

वर्षभरापूर्वी शोभा डेंसह सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरलेले मध्य प्रदेशचे पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांनी आपले 65 किलो वजन घटवले आहे. गेल्या वर्षी झालेल्या महापालिका मतदानाच्या काळात शोभा डे यांनी ट्विटरवर दौलतराम यांचा फोटो शेअर करून त्यांची खिल्ली उडवली होती.

दौलतराम यांच्यावर नुकतीच मुंबईतली एका खासगी रुग्णालयात बॅरियाटिक सर्जरी करण्यात आली आणि त्यांनी जवळपास 65 किलो वजन कमी केले. पित्ताशयाचा आजार असल्याने तसेच शरीरातील इन्सुलिनचेही प्रमाण वाढल्यानंतर आपले वजन झपाट्याने वाढले असल्याचे त्यांनी सांगितले होते. आपल्या शरीरामुळे आपण सोशल मीडियावर ट्रोल होत आहोत हे कळताच पुढच्या 18 महिन्यांत आपण नक्कीच वजन घटवण्याचा प्रयत्न करू असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांनी 65 किलो वजन कमी केले आहे. पुढच्या सहा महिन्यांत 30 किलो वजन कमी करणार असल्याचंही ते म्हणाले. बॅरियाटिक सर्जरीमुळे त्यांचे वजन 180 किलोवरून 115 किलो झाले आहे.

Top 10 News

Facebook Likebox

Popular News