Monday, 17 December 2018

डी गँगला मोठा दणक; दाऊद इब्राहिमच्या विश्वासू साथीदाराला अटक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय सुरक्षा यंत्रणानं दाऊदच्या विश्वासू साथीदाराला अटक करुन दाऊदच्या डी गँगला मोठा दणका दिला आहे फारुख टकला दुबईवरुन मुंबईला येताच क्षणी त्याला पोलिसांनी अटक केलीय आहे. केंद्रीय अन्वेक्षण विभागाने ही अटक केली आहे.

यात फारूख टकला च्या चौकशीतून महत्वाचे धागेदोरे मिळण्याचा दावा केला सध्या केला जातोय. यासिन मन्सूर मोहम्मद फारूख उर्फ फारूख टकला विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती.

गुरुवारी मुंबईच्या विशेष टाडा कोर्टासमोर फारूख टकला हजर करण्यात आलं. सीबीकडून फारूखला दुबईतून आणल्यानंतर मुंबई विमानतळावरच फारुखला पोलिसांनी अटक केली. मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर फारुख भारतातून पळून गेला होता.

१९९५ मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. फारुख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्वासू साथीदारांपैकी तो एक होता. १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचा देखील सहभाग होता.


मुंबईच्या इतिहासातील त्या काळ्या दिवशी नेमक काय झालं पाहूयात

12 मार्च 1993 ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडे पहिला स्फोट झाला. दुपारी 1 वजून 30 मिनीटांनी बेसमेंट मधील आरडीएक्स ने भरलेल्या गाडीत भिषण स्फोट झाला या स्फोटात 84 जणांचा म्रत्यु तर 200 हून अधिक जखमी झाले.

दुसरा स्फोट: नरसी नाथ स्ट्रीट

तीसरा स्फोट: शिवसेना भवन अडिच वाजता

चौथा स्फोट: एअर इंडिया बिल्डिंग 2 वाजून 33 मिनीटांनी

पाचवा स्फोट: माहिम 2 वाजून 45 मिनीटांनी

सहावा स्फोट: सेंचुरी बाजार 2 वाजून45 मिनीटांनी

सातवा स्फोट: झावेरी बाजार 3 वाजून 5 मिनीटांनी

आठवा स्फोट: वांद्रे, सी रोक होटल 3 वाजून 10 मिनीटांनी

नववा स्फोट: दादर प्लाझा थिएटर 3 वाजून13 मिनीटांनी

दहावा स्फोट : जुहू सेंटोर होटेल 3 वाजून 20 मिनीटांनी

अकरावा स्फोट: 3 वाजून 30 मिनीटांनी सहारा विमानतळ

बारावीच्या स्फोट: 3 वाजून 40 मिनीटांनी सेंटोर होटेल एअरपोर्ट

loading...

Top 10 News

राशी भविष्य