Monday, 17 December 2018

दाऊदचा साथीदार फारुख टकलाला दुबईतून मुंबईत आणण्यात सीबीआयला यश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून गुरुवारी सकाळी मुंबईत आणलं गेलं. फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 93 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं.

फारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती. शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता. त्याला थोड्याच वेळात टाडा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

सीबीआयने आजपर्यंत त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर सीबीआयच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याला पकडल गेल. याआधी टकलाने बऱ्याचदा चकवा दिला तसेच तो दुबई, यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता.

आज फारुख टकलाला अटक करण हे सीबीआयचं मोठं यश मानण्यात येत आहे. टकला हा दाऊदचा खूप जवळचा साथीदार असल्याने त्याच्याकडून दाऊदबाबतची बरीच माहिती मिळेल अशी शक्यता सर्व स्तरांतून वर्तवली जात आहे. 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांनी आपला जीव गमावला होता आणि 713 जण गंभीर जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. त्यासाठी आरडीएक्स आणि सर्व सामान पाकिस्तानातूनच आणल गेल होत.

या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य